Accident : भीषण अपघात; ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या पोटावरून गेल्याने जागीच मृत्यू

दुचाकी व कंटनेरच्या अपघातात (Accident) ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या पोटावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात भूगाव ते बावधन मार्गावर शुक्रवारी (३ नोव्हेंबर) घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 4 Nov 2023
  • 06:00 pm
Accident

संग्रहित छायाचित्र

दुचाकी व कंटनेरच्या अपघातात (Accident) ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या पोटावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात भूगाव ते बावधन मार्गावर शुक्रवारी (३ नोव्हेंबर) घडला आहे.

अनिल राघू भुरुक (वय 46 रा.भुगाव) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलीस (Hinjewadi Police) ठाण्यात मृत अनिल यांचे पुतणे अमित अर्जून भुरुक (वय ३० रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून टाटा हाय़वा वरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते अनिल भुरुक हे दुचाकीवरून कर्वे रोड ला जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील हायवा भरधाव वेगात चालवून वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भुरूक यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात भुरुक हे खाली पडले व त्यांच्या पोटावरून ट्रकचे चाक गेले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest