Lalit Patil Drug case : ड्रग्स माफिया ललित पाटीलला ७ दिवसांची पोलीस कोठडी

आज ललित पाटील यांच्यासह शिवाजी शिंदे, रोहित कुमार चौधरी या तिघांना पुणे पोलिसांनी (Pune Police) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ललित पाटीलसह तीघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Wed, 1 Nov 2023
  • 05:30 pm
Lalit Patil Drug case : ड्रग्स माफिया ललित पाटीलला ७ दिवसांची पोलीस कोठडी

ड्रग्स माफिया ललित पाटीलला ७ दिवसांची पोलीस कोठडी

ड्रग्स माफिया ललित पाटील (lalit Patil)  याला मंगळवारी मुंबईतून पुण्यात दाखल करण्यात आले होते. (Pune Crime News) त्यानंतर आज ललित पाटील यांच्यासह शिवाजी शिंदे, रोहित कुमार चौधरी या तिघांना पुणे पोलिसांनी (Pune Police) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ललित पाटीलसह तीघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयात माहिती देताना पुणे पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आता एकूण १४ आरोपी निष्पन्न झाले असून ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ललित पाटील हा मुख्य आरोपी असून आरोपी असून त्याने नाशिक मधून एमडी ड्रग्स आणले होते. यात चार कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांमध्ये ललित पाटील याचा देखील समावेश आहे, असं देखील यावेळी सांगितले आहे.

तर ललित पाटीलच्या बाजूने युक्तीवाद करताना वकील म्हणाले की, ललित पाटील याला ज्यावेळी चाकण प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याकडे पोलिसांनी पैशांची मागणी केली होती. तसेच पुणे पोलिसांकडून ललितचा जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ससून ड्रग्ज प्रकरणात 'मोस्ट वॉन्टेड' असलेल्या आरोपी ललित पाटीलचा (lalit Patil) ताबा पुणे पोलिसांना मंगळवारी मिळाला. पुणे पोलिसांनी अंधेरीच्या न्यायालयात दाखल केलेले (Pune Crime News) प्रोड्यूस वॉरंट मान्य करण्यात आले होते. मंगळवारी पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेची पथके त्याला आणण्याकरिता मुंबईला रवाना झाली होती. दुपारी त्याचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाली. त्याच्याकडे आता दोन गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. मंगळवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेची पथके त्याला घेऊन पुण्यात दाखल झाली. त्याच्यासोबत शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी यांचाही ताबा पुणे पोलिसांना मिळाला होता. यासर्वांना आज (बुधवारी) पुणे न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने ७ दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest