श्वानप्रेमी काळजीत! पुण्यात दुचाकीवरून कुत्रे पळवले

पुण्यात महागड्या ब्रीडच्या श्वानाची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुणे सातारा रस्त्यावर असलेल्या गुजरवाडी फाट्यावर घडला. 

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 02:52 pm

श्वानप्रेमी काळजीत! पुण्यात दुचाकीवरून कुत्रे पळवले

पुण्यात महागड्या ब्रीडच्या श्वानाची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुणे सातारा रस्त्यावर असलेल्या गुजरवाडी फाट्यावर घडला. 

पुण्यातील सातारा रस्त्यावर असलेल्या गुजरवाडी फाट्यावरून  प्रसिद्ध बॉक्सर जातीचा कुत्रा चोरट्यांनी दुचाकीवरून पळवून नेला. गुजरवाडी येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाचा हा कुत्रा होता. त्याची किंमत तब्बल ५० हजार रूपये होती. हा कुत्रा दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

या प्रकरणी दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात  चोरट्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Share this story

Latest