Dighi : लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचे अश्लील फोटो केले व्हायरल

लग्नाला नकार दिल्यामुळे एका तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील न्यु लॉ कॉलेज भारती विद्यापीठ आणि दिघीतील भारतमातानगर सहकार कॉलनी परिसरात १७ ऑगस्ट २०२० ते २७ मे २०२३ च्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी तरुणाविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 29 May 2023
  • 01:24 pm
लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचे अश्लील फोटो केले व्हायरल

लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचे अश्लील फोटो केले व्हायरल

तरुणाविरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नाला नकार दिल्यामुळे एका तरुणीचे अश्लील फोटो (Nude photos) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील न्यु लॉ कॉलेज भारती विद्यापीठ आणि दिघीतील (Dighi) भारतमातानगर सहकार कॉलनी परिसरात १७ ऑगस्ट २०२० ते २७ मे २०२३ च्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी तरुणाविरोधात पोलीसांनी गुन्हा (fir) दाखल केला आहे.

रोहीत कांतीलाल भोसले (वय ३४, रा प्रतीकनगर कोथरुड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने पीडित तरुणीकडे सोबत आणि लग्न करण्याची मागणी घातली होती. मात्र, तरुणीने नकार दिला. त्यानंतर रोहितने तरुणीचा सातत्याने पाठलाग केला. पीडित तरुणीला शिवीगाळ करून मारहाणही केली. तरी देखील तरुणीने नकार दिल्यामुळे तिचे अश्लील फोटो पीडितेच्या बहीणीच्या व्हॉटसअप नंबरवर पाठवून व्हायरल केले. या प्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी कलम ३५४ (ड) ५००, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (ए) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकणाचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest