‘थ्रीसम’ करू म्हणत ‘आयटी इंजिनियर’कडे शरीर सुखाची मागणी

कोथरूड (Kothrud) परिसरातील प्रसिद्ध आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या एका आयटी अभियंता महिलेकडे तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आयटी अभियंत्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, फिर्यादी महिलेला बसला धक्का

पुणे : कोथरूड (Kothrud) परिसरातील प्रसिद्ध आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या एका आयटी अभियंता महिलेकडे तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आयटी अभियंत्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेला पार्किंगमध्ये एकटे गाठत तिला लॉजवर येण्यास सांगत ‘थ्रीसम सेक्स’ करूया असे म्हणत तिचा विनयभंग केला. ही घटना १३ मार्च रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास  आणि २८ मार्च रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी भादवि ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

ऋषीकेश सुनील धिवार (वय ३२, रा. गणेश नगर, डांगे चौक, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिला आणि आरोपी धिवार हे एकाच आयटी कंपनीत नोकरी करतात. हे दोघेही आयटी अभियंते आहेत. पिडीत महिला विवाहित असून कुटुंबासोबत राहते. हे दोघे मागील काही महिन्यांपासून या कार्यालयात काम करीत असल्यामुळे  त्यांची एकमेकांशी तोंडओळख आहे. त्यांच्यामध्ये फारसे बोलणे होत नव्हते. ही महिला काम संपवून घरी जात असताना आरोपी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. १३ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास पिडीत महिला काम संपवून घरी निघाली होती. इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी काढण्यासाठी ही महिला आली असता आरोपी धिवार त्याठिकाणी आला. त्याने या महिलेला ‘तु माझ्यासोबत लॉजवर चल. माझा मित्र व मला तुझ्यासोबत थ्रीसम करायचे आहे.’ असे म्हटलं. 

या महिलेने त्याला ‘थ्री सम’ म्हणजे काय अशी विचारणा केली. तेव्हा आरोपीने तिला आम्हा दोघांना शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे असल्याचे सांगितले. यावेळी महिलेने त्याला याबाबत जाब विचारला. तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून याबाबत आपली तक्रार दाखल केली. याबाबत वरिष्ठ निरीक्षक संदेश देशमाने म्हणाले की, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून आरोपीला तपासासाठी हजर राहण्याची नोटीस दिली आहे. पुढील तपास कोथरूड पोलिसांकडून सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest