पुणे : धक्कादायक ! विवाहाच्या आमिषाने चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार

विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sat, 27 Apr 2024
  • 06:50 pm
Rape

धक्कादायक ! विवाहाच्या आमिषाने चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करुन बलात्कार

भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली. (Pune Crime News)

याबाबत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींच्या ताब्यातून मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी वैभव शिवराम मेरगो (वय ३२, रा. कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर), प्रशांत पांडुरंग बनसोडे (वय ४०, रा. टेंभुर्णी ता. माढा, सोलापूर) आणि सुमित वाल्मीकी (वय २५, रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वैभव मोरगो आणि प्रशांत बनसोडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार सुमित वाल्मीकी पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी वैभवने अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमिष दाखविले होते. साथीदार सुमित आणि प्रशांत यांच्याशी संगममत करून त्याने तिला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव मोरगो याची चॉकलेट वितरण एजन्सी आहे. प्रशांत बनसोडे वाहतूकदार आहे.वैभव मेरगो याने फिर्यादी यांच्या १४ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सुमित आणि प्रशांत यांच्या मदतीने १८ सप्टेंबर २०२२ रोजी पळवून नेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती त्याला होती. त्याने तिच्यावर अत्याचार केले. आरोपी प्रशांत याच्या छत्रपती संभाजीनगरमधील घरी मुलीला नेले. तेथे त्याने मुलीवर अत्याचार केले.

आरोपी वैभवने मोबाइलवर चित्रीकरण करून मुलीला धमकावले, तसेच आई आणि भावाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींना अटक केली. मुलीचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिली. पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest