बेटिंग, तमन्ना अन् समन्स

महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Actress Tamannaah Bhatia) समन्स पाठवले आहे. हे प्रकरण २०२३ मध्ये फेअरप्ले ॲपवर आयपीएल सामने पाहण्याच्या जाहिरातीशी संबंधित आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sat, 27 Apr 2024
  • 05:48 pm
Actress Tamannaah Bhatia

बेटिंग, तमन्ना अन् समन्स

महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Actress Tamannaah Bhatia) समन्स पाठवले आहे. हे प्रकरण २०२३ मध्ये फेअरप्ले ॲपवर आयपीएल सामने पाहण्याच्या जाहिरातीशी संबंधित आहे. हे ॲप महादेव ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग ॲपशी संबंधित आहे. अभिनेत्रीला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

सायबर सेलनुसार याप्रकरणी तमन्नाचा जबाब नोंदवला जाणार आहे. फेअरप्लेसाठी तिच्याशी कोणी संपर्क साधला आणि त्यासाठी तिला किती पैसे मिळाले यांसह अनेक मुद्दयांवर  तमन्नाची चौकशी केली जाईल.

एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. तमन्ना भाटियापूर्वी २३ एप्रिल रोजी अभिनेता संजय दत्तलाही याप्रकरणी समन्स बजावण्यात आले होते. संजयला समन्स बजावण्यात आले तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, तो सध्या मुंबईत नाही आणि दिलेल्या तारखेला हजर राहू शकत नाही. त्यांनी आपले म्हणणे नोंदवण्यासाठी तारीख आणि वेळ मागितली आहे.

गायक बादशाह, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेता संजय दत्तदेखील या ॲपची जाहिरात करतात. यापूर्वी याच प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने गायक बादशाह, संजय दत्त आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या व्यवस्थापकांचे जबाब नोंदवले होते. हे तिन्ही सेलिब्रिटी फेअरप्ले ॲपची जाहिरात करत आहेत. महादेव ॲप बेकायदेशीर व्यवहार आणि सट्टेबाजीसाठी विविध तपास यंत्रणांच्या चौकशीच्या कक्षेत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest