पुणे : मागील भांडणाच्या रागातून शिवीगाळ करत स्टीलच्या बादलीने केली मारहाण

मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत एकास लाकडी दांडक्याने तसेच स्टीलच्या बादलीने मारहाण केल्याची घटना समोर आली. हा प्रकार दिं. २५ एप्रिल रोजी गुरुवारी गवळी गोठा सोलापूर बाजार, कॅम्प पुणे येथे घडला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत एकास लाकडी दांडक्याने तसेच स्टीलच्या बादलीने मारहाण केल्याची घटना समोर आली. हा प्रकार दिं. २५ एप्रिल रोजी गुरुवारी गवळी गोठा सोलापूर बाजार, कॅम्प पुणे येथे घडला आहे. लष्कर पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News)

याप्रकरणी गणेश ईश्वर आहीर (वय.२३, रा. गवळी गोठा,घर नं.१३८ आहीर डेअरी सोलापुर बाझार, कॅम्प पुणे) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून लतीफ शेख (वय.४८, रा.गवळी गोठा, सोलापूर बाझार कॅम्प,पुणे), नुरजहा लतीफ शेख (वय.३८, रा.गवळी गोठा, सोलापूर बाझार कॅम्प,पुणे) नसरीन लतीफ शेख (रा.गवळी गोठा, सोलापूर बाझार कॅम्प,पुणे) यांच्या विरोध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकमेकांचे शेजारी असून दोघेही एकाच ठिकाणी कामास आहेत. कॅम्प येथील सोलापूर बाजारात असलेल्या गवळी गोठा येथे फिर्यादी व आरोपी कामास आहेत. या दोघांमध्ये यापुर्वीही वाद झाले होते दरम्यान आरोपीने मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाळ केली तसेच त्यांना लाकडी दांडक्याने व स्टीलच्या बादलीने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी आहीर यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी लष्कर पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest