पुणे: विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या लष्करी जवानाविरुद्ध गुन्हा

पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी लष्करी जवानाविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

संग्रहित छायाचित्र

महिलेने दिली वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद

पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी लष्करी जवानाविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी लष्करी जवान राहुल रवींद्र पाटील (रा. हनुमाननगर, कोल्हापुरी गेट, अमरावती), रवींद्र पाटील, शारदा पाटील, पूजा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanawadi Police Station) फिर्याद दिली आहे. राहुल पाटील लष्करात जवान आहे. त्याचा विवाह झाला आहे. विवाह झाल्यानंतर त्याने विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वत:ची माहिती दिली होती. विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून त्याची नागपूरमधील एका ३५ वर्षीय महिलेशी ओळख झाली. पत्नीशी पटत नसल्याने घटस्फोट घेणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची बतावणी त्याने महिलेकडे केली. विवाहाच्या आमिषाने महिलेला त्याने जाळ्यात ओढले. (Pune Crime News)

त्यानंतर महिलेने पाटीलची पुण्यात (Pune ) भेट घेतली. पुण्याहून ते खासगी प्रवासी बसने अमरावतीला गेले. बसप्रवासात त्याने महिलेशी अश्लील कृत्य केले. त्यानंतर अमरावती परिसरात निर्जन ठिकाणी नेऊन त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेची छायाचित्रे काढून समाजमाध्यमात प्रसारित केली. विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला नकार दिला. पाटीलचे वडील रवींद्र महिलेच्या घरी गेले. माझा मुलगा लष्करात आहे, अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत. (Pune Police)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest