Crime News: 'इधर कोई बर्थडे मनायेगा नही' असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण

तरुणाने मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या कारणावरून तिघांनी तरुणाला मारहाण केली. 'इधर कोई बर्थडे मनायेगा नही', असे म्हणत त्याच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. मुळशी तालुक्यातील बावधन येथे एका पानटपरीजवळ गुरुवारी (२५ एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

संग्रहित छायाचित्र

हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पिंपरी-चिंचवड: तरुणाने मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या कारणावरून तिघांनी तरुणाला मारहाण केली. 'इधर कोई बर्थडे मनायेगा नही', असे म्हणत त्याच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. मुळशी तालुक्यातील बावधन येथे एका पानटपरीजवळ गुरुवारी (२५ एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. अनुराग आनंद झा (वय २५, रा. बावधन, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (२६ एप्रिल) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार गणेश विठ्ठल माणे (वय ३०, रा. बावधन, ता. मुळशी) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश माणे याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराग यांचा वाढदिवस असल्याने अनुराग यांचा मित्र तेजस हर्षवर्धन झा हा केक घेऊन आला. त्याने अनुराग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पानटपरीजवळ थांबलेल्या गणेश याने व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ केली. 'इधर कोई बर्थडे मनायेगा नही', असे म्हणून तेजस याला हाताने मारहाण केली. तसेच तेथे पडलेली वीट उचलून डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादी अनुराग भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील हाताने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest