Pune Crime: घरफोडीत पावणेसहा लाखांचा ऐवज चोरी

पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोडीत पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. वानवडी भागातील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी राेकड आणि दागिने असा तीन लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

संग्रहित छायाचित्र

पुणे : शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोडीत पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. वानवडी भागातील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी राेकड आणि दागिने असा तीन लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात एका रुग्णालयातून चोरट्यांनी रोकड आणि अन्य साहित्य असा दाेन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वानवडीतील जांभुळकर चौकात असलेल्या एका इमारतीत राहायला आहेत. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलुप मध्यरात्री तोडले. कपाटातील रोकड आणि दागिने असा तीन लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस कर्मचारी देशमुख तपास करत आहेत.

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील एका रुग्णालयातून चोरट्यांनी रोकड आणि अन्य साहित्य दोन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत रुग्णालयातील कर्मचारी महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव बुद्रुक परिसरात मोरया मल्टिस्पेशलिटी रुग्णालय आहे. चोरट्यांनी रुग्णालयाच्या कार्यालयीन कक्षात प्रवेश केला. कपाटातील रोकड आणि अन्य साहित्य असा दोन लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest