पिंपरी-चिंचवड : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी ( २५ एप्रिल) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली. भरत तुकाराम जैद (वय ३०, रा. चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

संग्रहित छायाचित्र

चाकण : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी ( २५ एप्रिल) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली. भरत तुकाराम जैद (वय ३०, रा. चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pimpri Chinchwad Crime)

या प्रकरणी पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण-शिक्रापूर रोडवर कडाचीवाडी येथे एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून भरत जैद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा ५० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest