Pune : 'डिलीव्हरी बॉय' पिता-पुत्राला मारहाण करणारे गजाआड

एका नामांकित डिलिव्हरी ॲपमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या पिता-पुत्रांना मारहाण (beating) करून त्यांना लुटणाऱ्या आरोपींना ४८ तासांच्या आत सहकारनगर पोलिसांनी (Sahkarnar Police) जेरबंद केले आहे.

Pune Crime

'डिलीव्हरी बॉय' पिता-पुत्राला मारहाण करणारे गजाआड

पुणे : एका नामांकित डिलिव्हरी ॲपमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या पिता-पुत्रांना मारहाण (beating)  करून त्यांना लुटणाऱ्या आरोपींना ४८ तासांच्या आत सहकारनगर पोलिसांनी (Sahkarnar Police) जेरबंद केले आहे. बर्गरची डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना तंबाखू मागण्याच्या पाहण्याने त्यांना मारहाण करीत लुबाडण्यात आले होते. याप्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. (Pune Crime) 

शंतनू मारुती लोहार (Santnu lohar)  (वय १८, रा. दुर्वांकुर सोसायटी, धनकवडी), मंगेश उर्फ मंग्या हनुमंत चौरे (वय २१, रा. नवनाथ नगर, धनकवडी), आविष्कार उर्फ अव्या अशोक दिघे (वय २२, रा. रामदेव हाईट्स, गुलाब नगर, धनकवडी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे वडील एका नामांकित कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ते वडिलांसह धनकवडी येथील नवनाथ नगरमध्ये बर्गरची डिलिव्हरी करण्यासाठी जात होते. त्यावेळी या तिघा जणांनी त्यांना थांबवले. त्यांनी तंबाखू मागण्याचा बहाणा केला. फिर्यादीच्या वडीलांनी तंबाखू नसल्याचे सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी लाईटच्या ट्यूबच्या नळीने त्यांना मारहाण करून जखमी केले. त्यांचा मोबाईल चोरला.

याप्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपींचा शोध घेण्यात सुरुवात करण्यात आली. कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या महामार्गावर दत्तनगर जवळ जय भवानी हॉटेल समोर आरोपी उभे असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी बेरड, बापू खुटवड, पोलीस अंमलदार बजरंग पवार, संजय गायकवाड, अमोल पवार, निलेश शिवतरे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर कुंभार, विशाल वाघ यांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

सहकारनगर पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकाश अरुण कांबळे उर्फ छोट्या (वय २८, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर नुकताच सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर एकूण २२ गुन्हे दाखल आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest