Pune Crime News : धायरीमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार, अवघ्या चोवीस तासात दुसरी घटना

सोमवारी संध्याकाळी धायरी (Dhairi) भागातील रायकर मळा परिसरात तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना सायंकाळी पाच (Pune News) वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी (Sinhagad Road Police) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 30 Oct 2023
  • 07:00 pm
Pune Crime News : धायरीमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार, अवघ्या चोवीस तासात दुसरी घटना

धायरीमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार, अवघ्या चोवीस तासात दुसरी घटना

अवघ्या चोवीस तासाच्या आत पुण्यात गोळीबाराच्या (Firing) दोन घटना घडल्याने खळबळ माजली आहे. खडक पोलीस (Khadak Police) ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठेत तरुणावर गोळीबार करून त्याचा (Pune Crime News) खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी संध्याकाळी धायरी (Dhairi) भागातील रायकर मळा परिसरात तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना सायंकाळी पाच (Pune News) वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी (Sinhagad Road Police) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओम लोहकरे (Om Lohkare) (वय २५) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धायरीतील रायकर मळा परिसरात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हल्लेखोरांनी तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला धायरीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तरुणावर पूर्व वैमन्यासातून गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, अज्ञात कारणावरून ३५ वर्षीय तरुणाचा डोक्यामध्ये गोळी (Pune Crime News) घालून खून करण्यात आल्याची घटना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडी पेठेमध्ये (Khadak police station) घडली होती. या घटनेला चोवीस तास होत नाहीत तोच धायरी भागातील रायकर मळा परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. सलग दोन गोळीबाराच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest