दर्शना पवार हत्या प्रकरण : राहुल हंडोरेची रवानगी येरवडा कारागृहात

एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवारचा रायगडाच्या पायथ्याशी खून करण्यात आला होता. या प्रकरणी अटक झालेल्या राहुल हांडोरे याची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 4 Jul 2023
  • 11:57 am
राहुल हंडोरेची रवानगी येरवडा कारागृहात

राहुल हंडोरेची रवानगी येरवडा कारागृहात

सोमवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर करण्यात आले न्यायालयात हजर

एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवारचा रायगडाच्या पायथ्याशी खून करण्यात आला होता. या प्रकरणी अटक झालेल्या राहुल हांडोरे याची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते.

दर्शनाचा मृतदेह १८ जून रोजी रायगडाच्या पायथ्याशी सापडला होता. खून करून आरोपी राहुल हंडोरे पसार झाला होता. त्याला मुंबई परिसरातून ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. दर्शनाने विवाहास नकार दिल्याने तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरने वार करून खून केल्याची कबुली हंडोरेने दिली होती.

हंडोरेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. हंडोरेच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने हंडोरेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार हंडोरेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest