पिंपरी-चिंचवड : डी. वाय. पाटील रुग्णालयात डॉक्टरला धक्काबुक्की

पिंपरीमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तातडीच्या विभागात कर्तव्यावर असलेला पुरुष परिचारक, महिला सुरक्षारक्षक आणि एका डॉक्टरला धक्काबुक्की करून शिवीगाळ करत राडा घातल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

धक्का देऊन खाली पाडल्याने महिला सुरक्षारक्षक जखमी

पिंपरीमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तातडीच्या विभागात कर्तव्यावर असलेला पुरुष परिचारक, महिला सुरक्षारक्षक आणि एका डॉक्टरला धक्काबुक्की करून शिवीगाळ करत राडा घातल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (२७ जून) पहाटे दोन वाजता घडला. अजय सदानंद मोरे (वय, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी शुभम दिलीप  नरुडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरुडे हे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तातडीच्या विभागात पुरुष परिचारिका म्हणून काम करतात. गुरुवारी पहाटे दोन वाजता आरोपी मोरे रुग्णालयात आला. त्याने नरुडे यांना 'तू पहिले ट्रीटमेंट तर कर. सलाईन लाव. अगोदर पैसेच मागतो काय' असे म्हणत शिवीगाळ, आरडाओरडा केला. डॉ. नवमान खान यांना धक्काबुक्की करून नरुडे यांची कॉलर पकडली. सुरक्षारक्षक महिलेला धक्का देऊन त्यांना खाली पाडले. त्यात त्या जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest