Crime News : लॉज रूमचे भाडे न देता चालकाला केली मारहाण; पाच जणांना अटक

लॉज रूमचे भाडे न देता चालकालाच मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम जबरदस्तीने लुबाडून नेली आहे. वाकड पोलिसांनी या घटनेत पाच ही आरोपींना अटक केली आहे.ही घटना गुरुवारी रात्री राहणे येथे घडले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 27 Oct 2023
  • 06:50 pm
Crime News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी : लॉज रूमचे भाडे न देता (Pimpri Chinchwad) चालकालाच मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम जबरदस्तीने लुबाडून नेली आहे. वाकड पोलिसांनी (Wakad police) या घटनेत पाच ही आरोपींना अटक केली (Crime News) आहे.ही घटना गुरुवारी रात्री राहणे येथे घडले आहे.

याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात नितीन कडजल शेट्टी (Nitin Kadajal Shetty) (वय ५५) यांनी फिर्यादी दिली आहे. यावरून पोलिसांनी अनिकेत संतोष मापारी (वय २२ रा. पिंपरी गाव), आदित्य उर्फ निरंजन शाम अहिरराव (वय ३१ रा. काळेवाडी) आकाश एकनाथ शेटे (वय २५ रा. रहाटणी) आशिष एकनाथ शेटे (वय २३ रा. रहाटणी) प्रतीक अशोक माने (वय ९१ रा. थेरगाव) या पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संब्रम लॉज वर येऊन दमदाटी करून रूम वापरून त्याचे भाडे ही देत नसत. गुरुवारी ही ते रूम मागण्यासाठी आले असता फिर्यादी यांनी त्यांना नकार दिला या रागातून आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मॅनेजर चित्र शेट्टी यांना आम्ही इथले भाई आहोत म्हणत शिवीगाळ केली तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातून सहा हजार रुपये काढून घेऊन गेले यावरून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या असून, वाकड पोलीस तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest