येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी, १६ जणांविरोधात गुन्हा दाखल

येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैदी आपापसात भिडल्याचे समोर आले आहे. गालफाडे टोळी आक्रमक झाल्यानंतर १६ कैदी आपापसात भिडले आहेत. पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 20 Jun 2023
  • 11:53 am
येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी, १६ जणांविरोधात गुन्हा दाखल

येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी, १६ जणांविरोधात गुन्हा दाखल

गालफाडे टोळी आक्रमक झाल्यानंतर वाढला वाद

पुण्यातील येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैदी आपापसात भिडल्याचे समोर आले आहे. गालफाडे टोळी आक्रमक झाल्यानंतर १६ कैदी आपापसात भिडले आहेत. पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी १६ कैद्यांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश शांताराम येवले, प्रणव अर्जुन रणधीर, विजय चंद्रकांत वीरकर, सचिन शंकर दळवी, मुकेश सुनील साळुंखे, गणेश वाघमारे, आदित्य नानाजी चौधरी, किरण रमेश गालफाडे, आकाश उत्तम शिनगारे, विशाल रामधन खरात, रुपेश प्रकाश आखाडे, रोहित चंद्रकांत जुजगर, शुभम गणपती राठोड, अनराग परशुराम कांबळे आणि मेहबूब फरीद शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक तीन आणि बराक क्रमांक आठमध्ये कैद्यांमध्ये झाला होता. त्यानंतर गालफाडे टोळी आक्रमक झाली. यात दोन गटातील एकूण १६ कैद्यांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीत दगड, तसेच पत्र्याच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला. कारागृहातील बराकीत वर्चस्वाच्या वादातून हाणामारीची घटना घडल्याचा संशय आहे. या प्रकरणी येरवड पोलीस ठाण्यात १६ कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest