महाविद्यालयीन तरुणांकडून ११ लाखाचा गांजा जप्त, तीन जणांना अटक

तीन महाविद्यालयीन तरुणांकडून पोलीसांना तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांचा ५६ किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चंदननगर परिसर रविवारी केली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 19 Jun 2023
  • 10:36 am
arrested : महाविद्यालयीन तरुणांकडून ११ लाखाचा गांजा जप्त, तीन जणांना अटक

संग्रहित छायाचित्र

चंदननगर परिसरातून पोलीसांना तीघांना घेतले ताब्यात

तीन महाविद्यालयीन तरुणांकडून पोलीसांना तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांचा ५६ किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चंदननगर परिसर रविवारी केली आहे. या प्रकरणी तीन महाविद्यालयीन तरुणांना अटक केली आहे.

राम राजेश बैस (वय २०, रा. रामपुरी वॉर्ड, कॅम्प परिसर, गडचिरोली), ऋतिक कैलास टेंभुर्णे (वय २१, रा. गौराळा, ता. लाखुंदर, जि. भंडारा) आणि निकेश पितांबर अनोले (वय २२, रा. कस्तुरबा वॉर्ड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन तरुणांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गडचिरोलीतील तीन महाविद्यालयीन तरुण चंदननगर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी ५५ किलो गांजा आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. तीघांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest