Bhosari : चाकूचा धाक दाखवून करायचा प्रवाशांची लुटमार, रिक्षा चालकाला अटक

भोसरीत परिसरात रिक्षात बसवून प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लुटमार करणाऱ्या या टोळक्यांच्या भोसरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 31 May 2023
  • 11:25 am
Bhosari : चाकूचा धाक दाखवून करायचा प्रवाशांची लुटमार, रिक्षा चालकाला अटक

भोसरी पोलीस

भोसरी पोलीसांनी तपासले ४०० रिक्षा आणि १५० सीसीटीव्ही कॅमेरे

भोसरीत परिसरात रिक्षात बसवून प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लुटमार करणाऱ्या या टोळक्यांच्या भोसरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

दिलीप शिवराम गायकवाड (रा. शिवाजी चौक, एसपी ऑफीस मागे, लातूर) आणि संदीप साहेबराव पवार (रा. महापुर, लातुर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून रात्रीच्या वेळी भोसरी एमआयडीसी परिसरात नेऊन लुटण्यात आले होते. या प्रकरणी संबंधित प्रवाशाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, यावेळी रिक्षाचा नंबर अंधारात व्यवस्थित दिसला नसल्याने फिर्यादीने अर्धवट नंबर सांगितला होता. त्यामुळे रिक्षा चालकाला शोधणे पोलीसांसमोर आव्हान होते.

अर्धवट नंबरच्या आधारे तपास करत असताना पोलीसांनी तब्बल ४०० रिक्षा आणि १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मात्र, रिक्षावाला फिरस्ता असल्याने पोलीसांना कोणताही ठोस पुरावा सापडत नव्हता. अखेर तांत्रिक तपास दिलीप गायकवाडचे नाव निष्पन्न होऊन तो वाकड परिसरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी दिलीपसह त्याचा साथीदार संदीपला अटक केली. त्यांच्याकडून प्रवाशाचा मोबाईल, रोख रक्कम आणि चोरलेली बॅग पोलीसांनी जप्त केली आहे. या प्रकणाचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest