Accident : भरधाव 'थार'ने श्वानाला चिरडले, प्राणिप्रेमी नागरिकांकडून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रस्त्यावर झोपलेल्या नऊ वर्षांच्या 'पिंकी' नावाच्या श्वानाला मोटारीखाली चिरडण्यात आले. या घटनेत श्वानाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून 'थार'चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 7 Oct 2023
  • 02:40 pm
Accident : भरधाव 'थार'ने श्वानाला चिरडले, प्राणिप्रेमी नागरिकांकडून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भरधाव 'थार'ने श्वानाला चिरडले, प्राणिप्रेमी नागरिकांकडून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लक्ष्मण मोरे 

पुणे : रस्त्यावर झोपलेल्या नऊ वर्षांच्या 'पिंकी' नावाच्या श्वानाला मोटारीखाली चिरडण्यात आले. या घटनेत श्वानाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून 'थार'चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलिसांनी एमएच १२, युएन ७६११ या मोटारीवरील चालकाविरुद्ध भादवि कलम ४२९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९, मोटार वाहन कायदा कलम १८४, प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (एल) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शशी नारायण भुषण (वय ४२, रा. साळुंखे विहार सोसायटी, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी  भूषण आणि त्यांच्या सोसायटीमधील माधवी आपटे, ज्योती पाटील, सलोनी भाटीया, प्रियंवदा सिंग, अवनी साठे, पराग परमाज, राहुल वागळे (सर्व रा. साळुंखे विहार सोसायटी, कोंढवा) यांचा ग्रुप आहे. या गृपच्या माध्यमातुन सोसायटीमधील भटक्या कुत्र्यांची व मांजरांची काळजी घेण्याचे तसेच त्यांचे व्हॅक्सीनेशन, वेळच्या वेळी करणे ईत्यादी काम केले जाते.  तसेच पुणे व परिसरात  कुठेही आजारी, अपघातग्रसत, टाकून दिलेले, हलाखीच्या परिस्थतीत असलेले भटकी कुत्री व मांजरी असल्याची माहिती मिळाल्यावर, त्या ठिकाणी जाऊन जनावरांना रेस्क्यू करुन त्यांचेवर औषधोपचार करण्याचे काम देखील केले जाते.

घटनेच्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी रात्री शशी भूषण हर त्यांच्या कामानितीत्त जांभुळकर चौक, वानवडी येथे गेले होते. सोसायटीमध्ये राहणा-या अवनी साठे यांनी त्यांना फोन केला. त्यांनी ''आपल्या सोसायटीमध्ये असलेल्या पिंकी या कुत्रीच्या अंगावरुन कोणीतरी अज्ञात चालकाने थार गाडी घातल्याने ती गंभीर जखमी झालेली आहे” असे कळविले. शशी हे तात्काळ त्यांच्या सोसायटीमध्ये गेले. तेव्हा सोसायटीमधील शॉपिंग सेंटरच्या विरुद्ध बाजूला पिंकी नावाची कुत्री वय ९ वर्षे ही गंभिर जखमी अवस्थेत ओरडत असल्याचे दिसले. त्यांनी व अवनी साठे यांनी पिंकी नावाच्या कुत्रीला बी. टी. कवडे रस्त्यावर असलेल्या रेन ट्री क्लिनीकमध्ये डॉ. गुरुविंदर कौर यांच्याकडे नेले. डॉक्टरांनी पिंकीवर उपचार केले. परंतु, पिंकीच्या हृदयाचे ठोके जास्त होते. डॉक्टरांनी आहे त्या स्थितीत उपचार सुरु केले. परंतु, तिचा उपचारादरम्यान दुस-या दिवशी पहाटे मृत्यू झाला.

या सर्व कार्यकर्त्यांनी २२ सप्टेंबर रोजी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यांच्या सोसायटीमध्ये असलेल्या शॉपिंग सेंटरच्या विरुद्ध बाजूला पिंकी नावाची कुत्री झोपलेली असताना तिच्या अंगावरून काळया रंगाची 'महिन्द्रा थार' क्रमांक एमएच १२. युएन ७६११ गेल्याचे दिसले. या कारवरील चालकाने बेदरकारपणे गाडी चालवीत पिंकीला गंभीर जखमी करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. शशी भूषण यांनी सहका-यांशी चर्चा करून कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest