Sadashiv Peth : सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणाऱ्याला जामीन मंजूर

पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) असे जामिन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदाशिव पेठेत भररस्त्यात त्याने तरुणीवर पळत जात हल्ला करण्याता प्रयत्न केला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 3 Oct 2023
  • 04:19 pm
सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणाऱ्याला जामीन मंजूर

सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणाऱ्याला जामीन मंजूर

पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) असे जामिन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदाशिव पेठेत भररस्त्यात त्याने तरुणीवर पळत जात हल्ला करण्याता प्रयत्न केला होता.

जून महिन्यात पुण्यात भररस्त्यात हल्ल्याचा थरार पाहायला मिळाला होता. २७ जून २०२३ रोजी सदाशिव पेठेत सकाळी दहाच्या सुमारास तरुणीवर कोयत्याने वार केले होते. त्यामुळे मोठी खबळब उडाली होती. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. राजकारण्यापासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांनी संताप व्यक्त केला होता.

मात्र स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या लेशपाळ जवळगे या तरुणाच्या प्रसंगावधानाने तरुणी थोडक्यात बचावली. त्यावेळी काही तरुणांनी आरोपी जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पीडित २० वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून जाधवच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जाधव कोठडीत होता. शंतनू जाधव या तरुणाने अॅड. अभिषेक हरगणे, ॲड. स्वप्नील चव्हाण, ॲड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटींवर जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest