Pune : दाम्पत्यावर दगडफेक करीत लुटण्याचा प्रयत्न

दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीवर दगडफेक करून त्यांची गाडी अडवीत लूटमार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) येथील टिळेकर नगर (Tilekar Nagar) मधील द्वारका नगरी सोसायटीच्या रस्त्यावर रविवारी घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) गुन्हा दाखल केला आहे.

Pune : दाम्पत्यावर दगडफेक करीत लुटण्याचा प्रयत्न

दाम्पत्यावर दगडफेक करीत लुटण्याचा प्रयत्न

पुणे : दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीवर दगडफेक करून त्यांची गाडी अडवीत लूटमार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) येथील टिळेकर नगर (Tilekar Nagar) मधील द्वारका नगरी सोसायटीच्या रस्त्यावर रविवारी घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) गुन्हा दाखल केला आहे.

संकेत अवघडे (वय २०), करण अर्जुन रणसिंग (वय २०), सोन्या उर्फ निखिल संतोष साबळे (वय १९) अशी आरोपींची नावे आहेत. यातील अवघडे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी योगेश नारायण उमापे (वय ३९, रा. न्यू मोदीखाना) यांनी फिर्याद दिली आहे. उमापे आणि त्यांची पत्नी मोटरसायकल वरून टिळेकर नगरमधील द्वारका नगरी सोसायटीच्या समोर असलेल्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या चढावरून जात असताना आरोपी अंधारामध्ये लपून बसलेले होते. या टोळक्याने अचानक  पत्राच्या कंपाऊंडच्या पाठीमागून त्यांच्यावर जोरात दगडफेक सुरू केली.

अचानक दगडफेक होऊ लागल्यामुळे त्यांनी गाडी थांबवली.  त्यांची गाडीअडवीत धक्काबुक्की करून शिवीगाळ करायला सुरुवात केली. अवघडे याने त्याच्या हातातील लाकडी बांबूने उमापे यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. हा हल्ला झाल्यामुळे त्यांच्या पत्नीने मदतीसाठी जोरजोरात आरडा ओरडा सुरू केला. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी थांबून त्यांच्या मदतीला धाव घेतली. नागरिक त्यांना पकडायला येत असल्याचे पाहून आरोपी पसार झाले. दरम्यान, अवघडे हा नागरिकांच्या हाती लागला. नागरिकांनी चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest