Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या नावे जमीन बळकावण्याचा प्रयत्न, गुन्हे शाखा युनिट ३ ची केली अटक

हडपसर (Hadapsar) येथील वनविभागाच्या १८ एक्कर जमीन बळकावण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपीला अटक (Arrested) करण्यात आली आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने ही (Crime Branch) कारवाई केली आहे. आरोपीने तत्कालीन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश प्रशासनाला सादर केला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 27 Oct 2023
  • 12:31 pm
 Chandrakant  Patil : चंद्रकांत पाटलांच्या नावे जमीन बळकावण्याचा प्रयत्न, गुन्हे शाखा युनिट ३ ची केली अटक

चंद्रकांत पाटलांच्या नावे जमीन बळकावण्याचा प्रयत्न, गुन्हे शाखा युनिट ३ ची केली अटक

हडपसरमधील वनविभागाची १८ एकर जमिन ढापण्याचा प्रयत्न

ओंकार गोरे

हडपसर (Hadapsar) येथील वनविभागाच्या १८ एक्कर जमीन बळकावण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपीला अटक (Arrested) करण्यात आली आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने ही (Crime Branch) कारवाई केली आहे. आरोपीने तत्कालीन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश प्रशासनाला सादर केला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकार (Pune News) घडला होता.

पोपट पांडुरंग शीतकल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हवेलीच्या तत्कालीन तहसीलदार तृप्ती कोलते यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे सातबाऱ्यावर संबंधीत व्यक्तीचे नावही लागले होते. संबंधित जागेची बाजारभावानुसार किंमत सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात होते. मात्र, घडलेला प्रकार उघडकीस आल्यापासून आरोपी पसार झाला होता.

शितकल याच्या पुर्वजांना वतनापोटी देण्यात आलेली हडपसर येथील सर्व्हे क्रमांक ६२ मधील १८ एकर वनक्षेत्रातील जमीन कायमस्वरुपी आपल्या नावावर करून देण्याची मागणी महसुल विभागाकडे करण्यात आली होती. याबाबत शासनाने विचार करून निर्णय घेण्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनीही ही मागणी फेटाळली. या सगळ्या घडामोडीनंतर शितकल याने केलेला दावा तत्कालीन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाखल झाला. तेव्हा त्यांनीही त्याचा दावा फेटाळला. शितकलचा दावा सर्वानी फेटाळल्यानंतरही त्याने संबंधीत जमीन आपल्या नावावर करावी, असा आदेश महसुल मंत्री पाटील यांनी दिल्याचा बनावट १६ पानी आदेश हवेली तहसीलदारांकडे दिला.

थेट महसुल मंत्र्यांचाच आदेश असल्याने महसुल विभागानेही आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया तत्काळ राबवून त्यांच्या नावे सातबारा केला. त्यानंतर हे प्रकरण वनविभागाकडे आल्यानंतर उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी प्रकरणाची माहिती घेतली. हि जमीन वन विभागाची असून ती हस्तांतर करता येत नाही, असे तहसीलदारांना कळवले. त्यामुळे महसूल विभागाने त्या आदेशाची सत्यता पडताळून पाहिली असता हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने खडक पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, तेव्हापासून आरोपी पोलिसांना पसार झाला होता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने आरोपीला अटक केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest