Pune Crime News : महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचा हात पकडून तिला शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याप्रकरणी एका विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News : महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचा हात पकडून तिला शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याप्रकरणी एका विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मागील दोन महिन्यांपासून रविवार पर्यंत घडली.

याप्रकरणी दत्ता रामभाऊ होळकर (रा. होळकरवाडी, हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिला उरुळी देवाची या ठिकाणी राहते. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी महिला तिच्या घरी तसेच रस्त्याने जात असताना आरोपी तिचा पाठलाग करीत होता. आरोपीने तिच्या संमती शिवाय तिचा हात पकडला. 'तु माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव' असे म्हणत तिचा विनयभंग केला.

या महिलेने विरोध केला असता तिचा पाठलाग करून लाथा बुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest