Loni Kalbhor : पार्टी करण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून लुबाडले, तिघांवर मोक्का

पार्टी करण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून लुबाडल्याप्रकरणी अटक तिघांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आली. इंदापूरच्या निलेश बनसुडे टोळीतील तिघांचा समावेश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 26 Oct 2023
  • 12:13 pm
पार्टी करण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून लुबाडले

पार्टी करण्यासाठी पैसे नसल्याने दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून लुबाडले

लोणी काळभोर : पार्टी करण्यासाठी पैसे नसल्याने (Loni Kalbhor) दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून लुबाडल्याप्रकरणी अटक (Arrested) तिघांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत (Mokka Act) कारवाई केली आली. इंदापूरच्या (Pune News) निलेश बनसुडे टोळीतील तिघांचा समावेश आहे.

टोळी प्रमुख निलेश मल्हारी बनसुडे (वय २६ वर्ष, रा. राजवेलीनगर चौक, बनसुडे मळा, इंदापूर), ओम सोमदत्त तारगावकर (वय २१, रा. महतीनगर, इंदापूर) आणि रोहित मच्छिंद्र जामदार (वय २३, रा. जामदार गल्ली, कसबा पेठ, इंदापूर) यांचा समावेश आहे.

दिवेघाटात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला  धाक दाखवून लुबाडल्याप्रकरणी या तिघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १० जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काळेवाडी (ता. पुरंदर) येथून होंडा अमेझ या चारचाकीतून सासवडमार्गे इंदापूरकडे परतत असताना पार्टी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने आरोपींनी हा प्रकार केला. ११ जुलै रोजी या तिघांनाही अटक झाली होती. तिघांची गुन्ह्यांची पार्श्वभूमी असल्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१,,४) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

तिघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, पैकी टोळी प्रमुख निलेश मल्हारी बनसुडे याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अडवणूक करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest