संग्रहित छायाचित्र
मनाई आदेशाचा भंग करीत पिस्तूल बाळगणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले,दोन जिवंत काडतूस व चार रिकाम्या पुंगळ्या हस्तगत केल्या. ही कारवाई खेड तालुक्यातील कुरूळी गावात शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास करण्यात आली.
सुशील ऊर्फ बारक्या भतर गोरे (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी) आणि अक्षय प्रभाकर कणसे (वय २०, रा. बार्शी रोड, लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश पंढरीनाथ सावंत (वय २७) यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून स्वतःजवळ पिस्तूल बाळगले.
याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे व चार रिकाम्या पुंगळ्या असा एकूण एक लाख एक हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.