स्वारगेट परिसरात अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार

स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागात एका व्यक्तीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना रविवारी (११ जून) रात्री घडली आहे. रविवारी रात्री महर्षीनगर भागात सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत हर्षद कांतीलाल कटारिया (वय ३९, रा. नयनतारा सोसायटी, महर्षीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 13 Jun 2023
  • 08:29 am
स्वारगेट परिसरात अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार

स्वारगेट परिसरात अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार

दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने एकावर झाडली गोळी

#स्वारगेट

स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागात एका व्यक्तीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना रविवारी (११ जून) रात्री घडली आहे. रविवारी रात्री महर्षीनगर भागात सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत हर्षद कांतीलाल कटारिया (वय ३९, रा. नयनतारा सोसायटी, महर्षीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद कटारिया हे रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास त्यांच्या घरी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पाठीमागून दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आल्या. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने पिस्तूलमधून डोक्याच्या दिशेने एक गोळी झाडली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

कटारिया हे उपनगरी वार्ताहर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यापूर्वीही हर्षद कटारिया यांच्यावर २७ मे रोजी सायंकाळी महर्षीनगर येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलसमोरील परिसरात दुचाकीवर आलेल्या दोघांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली होती. 

या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच फिर्यादी यांना पुन्हा जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने गोळी झाडल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पुढील तपास करीत आहेत. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest