पिंपरी-चिंचवड : हॉस्पिटलमधून सव्वा लाखांची रोकड पळवली

रावेत येथील एका हॉस्पिटलचे शटर उचकटून चोरट्याने १ लाख २१ हजारांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी चोरट्याला अटक करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

रावेत: रावेत येथील एका हॉस्पिटलचे शटर उचकटून चोरट्याने १ लाख २१ हजारांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी चोरट्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (३० जून) सकाळी साडे दहा वाजता ट्वीन्स टाऊन सोसायटी, रावेत येथे उघडकीस आली. वरद विनायक मगर (वय २१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. स्वप्नील अरुण राणे (वय ३१, रा. निगडी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. राणे यांचे एस बी पाटील कॉलेज रोड, रावेत येथे ट्वीन्स टाऊन सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर स्कीन हाईव क्लिनिक आहे. शनिवारी रात्री साडे नऊ वाजता डॉ. राणे यांनी क्लिनिक कुलूप लाऊन बंद केले. रात्रीच्या वेळी चोरट्याने क्लिनिकचे शटर उचकटून आत प्रवेश केला. क्लिनिकमधून १ लाख २१ हजारांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest