शिक्षण उपसंचालकाने जमवली ‘काळी माया’: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल

शासकीय नोकरी करीत असताना भ्रष्टाचाराचा अवलंब करीत लाखों रुपयांची ‘काळी माया’ जमविल्याप्रकरणी पुण्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालकासह त्याच्या पत्नीवर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bribe

शिक्षण उपसंचालकाने जमवली ‘काळी माया’: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल

पुणे : शासकीय नोकरी करीत असताना भ्रष्टाचाराचा अवलंब करीत लाखों रुपयांची ‘काळी माया’ जमविल्याप्रकरणी पुण्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालकासह त्याच्या पत्नीवर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागामार्फत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अधिकारी सध्या नंदुरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे. या अधिकाऱ्याने त्याच्या सेवा काळात ३१ लाख ७८ हजार २०० रुपयांचे ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल २५.२६ टक्क्यांनी अधिक असलेली अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. 

प्रवीण वसंत अहिरे (Pravin Ahire) (वय ४६), पत्नी स्मिता प्रवीण अहिरे (वय ४१, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या पतीपत्नीची नावे आहेत. याप्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण अहिरे हे पुण्यात शिक्षण उपसंचालक म्हणून नोकरीस होते. सध्या ते नंदुरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या सेवा काळात बेहिशेबी मालमत्ता भ्रष्ट मार्गाने संपादीत केल्याची तक्रार एसीबीकडे दाखल करण्यात आलेली होती. या बेहिशेबी मालमत्तेबाबत एसीबीने उघड चौकशी सुरू केली होती. अहिरे यांच्या मालमत्ता कायदेशीर पद्धतीने संपादित केल्या आहेत की नाही? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती घेण्यात आली. मार्च २००२ ते फेब्रुवारी २०२० या कालावदही दरम्यानच्या सेवा कार्यकाळामधील उत्पन्न, खर्च यांच्या तपशीलाचे परिक्षण करण्यात आले. या चौकशीत त्यांनी कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार २०० रुपयांची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने कमावल्याचे उघड झाले. या करिता अहिरे यांना पत्नी स्मिता यांनी साथ व अपप्रेरणा दिली. तसेच, गुन्हा करण्यास प्रोत्साहित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest