पुणे: ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Lalit Patil, Pune Police, Sassoon Hospital, Pune Drugs News

ललित पाटील

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ससून हॉस्पीटलमध्ये 'एक्स रे' काढण्यासाठी घेऊन जाताना त्याला मदत केल्याचा आणि तो पळून गेल्यानंतर या प्रकाराची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीराने देण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि  पिराप्पा दत्तू बनसोडे अशी बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. 

हे दोघे ललित पाटील सोबत एक्सरे काढण्यासाठी गेले नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. या शिवाय घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास दिली असती तर पळून गेलेल्या ललित पाटीलला वेळेत पकडता आले असते. परंतु, या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास माहिती न कळवल्यामुळे ललित पाटीलला पळून जाण्यास वाव मिळाला असे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest