पुणे : अंगावर चिखल उडल्याने मजुराचा केला खून

नाल्यामधील मैलापाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीवरील चेंबरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अंगावर चिखल उडाल्याच्या कारणातून एका मजुराला चार जणांनी बेदम मारहाण केली.

Pune Murder

पुणे : अंगावर चिखल उडल्याने मजुराचा केला खून

गंभीर मारहाणीत जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : नाल्यामधील मैलापाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीवरील चेंबरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अंगावर चिखल उडाल्याच्या कारणातून एका मजुराला चार जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मजुराला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ज्ञानेश्वर निवृत्ती वाघमारे (वय ४४, रा. विकासनगर, किवळे, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार भगवान सहदेव आसबे (वय ४७, रा. रावेत) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चार आरोपींविर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपी राज परदेशी (रा. चाकण), प्रणव आंत्रे (रा. दिघी) यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. चैतन्य साळवे हा फरार असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा सोसायटीच्या पाठीमागील बाजूस एक नाला आहे. या नाल्यामध्ये १९ जून रोजी संध्याकाळी वाघमारे काम करीत होते. त्याठिकाणावरून परदेशी आणि त्याचे तीन मित्र चालत जात होते. त्यावेळी वाघमारे काम करीत असताना चुकून आरोपींच्या अंगवार चिखल उडाला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. रस्त्यावर पडलेले मोठे दगड त्यांच्या तोंडावर तसेच डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी वाघमारे यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच, आरोपींचा शोध घेऊन दोघा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

आरोपींना न्यायालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. तसेच अल्पवयीन आरोपीला  जामीनावर मुक्त केले. दरम्यान, उपचार घेत असलेल्या वाघमारे यांचे मंगळवारी रात्री रुग्णालयात निधन झाले. याप्रकरणी बेदम मारहाणीच्या गुन्ह्यात कलमवाढ करून आरोपी विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक शेळके यांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमर कदम करीत आहेत.

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा खुनाचा प्रयत्न

वडिलांना मारहाण केल्याच्या रागामधून एका तरुणावर हल्ला चढवित त्याला चाकूने ठिकठिकाणी भोसकण्यात आले. ही घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ओंकार प्रवीण मिसाळ (वय २०, रा. तळजाई वसाहत, सहकार नगर) असे जखमीचे नाव आहे. प्रसाद उर्फ लखन धनराज आरणे (वय ३०, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली आहे. ओंकारने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिसाळ आणि आरोपी आरणे याच्या वडिलांमध्ये वाद झाला होता. या वादातून ओंकारने आरणेच्या वडिलांना मारहाण केली होती. त्या रागातून ओंकारवर मंगळवारी रात्री भवानी पेठेतील मटण मार्केटजवळ हल्ला केला. त्याचे हात पकडत ‘तू माझ्या वडिलांना का मारले ?’ अशी विचारणा करीत चाकूने शरीरावर ठिकठिकाणी भोसकले. गंभीर जखमी झालेल्या ओंकारवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest