पुणे : बिबवेवाडीत १५ वर्षीय मुलाकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

बिबवेवाडीमध्ये खळबळ उडवून देणारी एक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या मुलाने १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

Pune Crime News

पुणे : बिबवेवाडीत १५ वर्षीय मुलाकडून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : बिबवेवाडीमध्ये खळबळ उडवून देणारी एक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या मुलाने १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीने याबाबत घरी सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. 

याप्रकरणी १४ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अप्पर बिबवेवाडी येथे राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहिता ६६ (२) (एम), ६५ (१), ७४ पोक्सो ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना बिबवेवाडी येथील अप्पर याठिकाणी १ जुलै आणि २ जुलै रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने या मुलीचा हात पकडून तिला जबरदस्तीने पिडीत मुलीच्या घराशेजारी असलेल्या बोळात ओढत नेले. त्याठिकाणी तिचे जबरदस्तीने कपडे काढून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच, या मुलीशी अनैसर्गिक कृत्य केले. यासोबतच, दोन महिन्यांपूर्वी पिडीत मुलीचे आईवडील घरी नसताना आरोपीने त्याच बोळात जबरदस्तीने नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच ही गोष्ट कोणाला सांगितल्यास फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest