भोसरी: बँकेतून काढलेली सात लाखांची रोकड चोरीला

भोसरी: बँकेतून सात लाख रुपये रोख रक्कम काढून बाहेर आलेल्या व्यक्तीचे लक्ष विचलित करून दुचाकीवरील दोन चोरट्यांनी ती रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि.१) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथील महाराष्ट्र बँकेसमोर घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 3 Jul 2024
  • 02:43 pm
Pimpri Chinchwad, Crime News, Bhosari, Bhosari Crime News,  Bank Robbery, Theft

संग्रहित छायाचित्र

भोसरी: बँकेतून सात लाख रुपये रोख रक्कम काढून बाहेर आलेल्या व्यक्तीचे लक्ष विचलित करून दुचाकीवरील दोन चोरट्यांनी ती रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि.१) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथील महाराष्ट्र बँकेसमोर घडली.

दत्तात्रय यशवंत चव्हाण (वय ६१, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण यांनी बांधकामासाठी बँकेतून सात लाख रुपये रोख रक्कम काढली होती. ती रक्कम घेऊन ते घरी जात होते. बँकेच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी पैसे असलेली पिशवी दुचाकीला अडकवली. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी चव्हाण यांना त्यांचे पैसे खाली पडले आहे, असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले आणि दुचाकीला अडकवलेली पिशवी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest