हिंजवडीत कारने कुत्र्याच्या पिल्लाला चिरडले, चालकाविरोधात गुन्हा दाखल

हिंजवडी: कारच्या धडकेत एका दिड महिन्याच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (९ जुलै) हिंजवडी फेज दोन येथे घडला आहे.

Hinjwadi, Hinjwadi Police Station, Pimpri Chinchwad, puppy crushed by a car

संग्रहित छायाचित्र

हिंजवडी: कारच्या धडकेत एका दिड महिन्याच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (९ जुलै) हिंजवडी फेज दोन येथे घडला आहे.

याप्रकरणी प्राणीमित्र नियती मधुरेंद्र रॉय (वय ३६ रा.हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून स्वप्नील रामचंद्र कुंभार (रा. कोथरूड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी य प्राणी मित्र असून त्यांना याची मिळताच त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आरोपी याने त्याच्या ताब्यातील कार बेदरकारपणे चालवून  दिड महिन्याच्या कुत्र्याच्या पिल्लाला चिरडले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात प्राण्यास निर्दयीपणे वागवण्यास प्रतिबंधीत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest