Crime News : हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करत लुटले; तिघांना अटक

कामगारांचे पीएफचे पैसे का भरले नाहीत असे विचारत चार जणांनी एका हॉटेल व्यवसायिकाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व महागडा फोन असा तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती लुबाडून नेला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 27 Oct 2023
  • 06:58 pm
Crime News : हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करत लुटले; तिघांना अटक

संग्रहित छायाचित्र

भोसरी : कामगारांचे पीएफचे पैसे का भरले नाहीत (Bhosari police station) असे विचारत चार जणांनी एका हॉटेल व्यवसायिकाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व महागडा (Crime News) फोन असा तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती लुबाडून नेला आहे. ही घटना गुरुवारी (२६ ऑक्टोबर) रात्री पंचरत्न रीजन्सी हॉटेल भोसरी येथे घडली.

शिवराज सुदाम लांडगे (वय ३६ रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्यादी दिली आहे फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी (MIDC Bhosari) पोलिसांनी आतापर्यंत दिनेश गोपाळ शेट्टी (वय ५३ रा. कात्रज) नितेश दिनेश शेट्टी (वय २१), सुदर्शन सिताराम शेट्टी (वय ३३ रा. बोसरे) या तिघांना अटक केली असून त्यांच्या सोबत असणाऱ्या एका वेटरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगे यांनी दिनेश याच्याकडे हॉटेलमधील कामगारांचे पीएफचे पैसे का भरले नाहीत याचे विचारणा करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने त्याच्या इतर साथीदारांसह लांडगे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत चाकू दाखवून त्यांच्या गळ्यातील चाळीस ग्रॅम वजनाची १ लाख २० हजार रुपयांची सोन्याची चैन काढून घेतली. तसेच खिशातील ७० हजार रुपयांचा फोन देखील काढून घेण्यात आला यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मारहाण व १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुबाडल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एमआयडीसी भोसरी पोलिसाचा तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest