Bhosari : हत्यार घेऊन दमदाटी व धमकी देत टोळक्याचा धुमाकूळ, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाच ते सहा जणांच्या (PCMC) टोक्याने हातात रोड व हत्यारे घेत एका नागरिकाच्या घराच्या दरवाजावर लाथा (Crime News) बुक्क्या मारून दमदाटी करून परिसरात दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) गुन्हा दाखल केला आहे ही घटना भोसरी येथे गुरुवारी रात्री चक्रपाणी वसाहत या परिसरात घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 27 Oct 2023
  • 06:54 pm
Bhosari : हत्यार घेऊन दमदाटी व धमकी देत टोळक्याचा धुमाकूळ, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

भोसरी : पाच ते सहा जणांच्या (PCMC) टोक्याने हातात रोड व हत्यारे घेत एका नागरिकाच्या घराच्या दरवाजावर लाथा (Crime News) बुक्क्या मारून दमदाटी करून परिसरात दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) गुन्हा दाखल केला आहे ही घटना भोसरी येथे गुरुवारी रात्री चक्रपाणी वसाहत या परिसरात घडली आहे.

याप्रकरणी बबन महादू सूर्यवंशी (वय ३२ रा. भोसरी) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून भोसरी पोलिसांनी अनिल जाधव, शुभम उर्फ दाद्या माने, सागर जाधव, विवेक मिडगुले, रामदास आंबीलपुरे, आरो अंबिलपुरे (सर्व रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे हातात लोखंडी रॉड व हत्यारे घेऊन आले.फिर्यादी यांच्या दरवाज्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दमदाटी करून धमकी दिली. परिसरात दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादीनुसार गाडीवर दगड मारून तोडफोड केली. गाडीवर दगड मारून तोडफोड केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest