लायसन्ससाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी, वेल्हेतील लिपीकाला अटक

सावकारी लायसन्स मिळविण्याच्या कामासाठी लिपीकाने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या लिपीकाला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 17 Jun 2023
  • 10:29 am
लायसन्ससाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी, वेल्हेतील लिपीकाला अटक

लायसन्ससाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी, वेल्हेतील लिपीकाला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

सावकारी लायसन्स मिळविण्याच्या कामासाठी लिपीकाने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या लिपीकाला अटक केली आहे.

पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर (लिपीक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, वेल्हे, ता. वेल्हे, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे. पंढरीनाथ यांनी एका ५५ वर्षीय व्यक्तीकडून लायसन्स मिळविण्याच्या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका ५५ वर्षीय व्यक्तीला लायसन्स हवे होते. यासाठी पंढरीनाथ तमनर यांनी सावकारी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा केला. मात्र, लायसन्स मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपये आणि स्वत:साठी २० हजार रुपये अशी एकूण ५० हजार रुपयांच्या लाचेची संबंधित व्यक्तीकडे मागणी केली.

तसेच मागणी केलेली रक्कम अन्य व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये भरण्यास सांगितली. याबाबत ५५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० मे रोजी बँकेत भरलेल्या रकमेची चौकशी केली. चौकशी घटना उघड झाल्यानंतर सापळा रचून लिपीक पंढरीनाथ तमनर यांना अटक केली. त्यांच्यावर वेल्हे पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वेल्हे पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest