Crime News : आयटी पार्क हिंजवडी परिसरात पकडला ३१ किलो गांजा

भाजीपाल्याचा कचरा वाहतूक करीत (Crime News) असल्याचे भासवून गांजा (Ganja) घेऊन जाणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi police) अटक केली आहे. गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Pimpri Chinchwad) सापळा रचून, ३१ किलो गांजा जप्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 31 Oct 2023
  • 07:16 pm
Crime News : आयटी पार्क हिंजवडी परिसरात पकडला ३१ किलो गांजा

संग्रहित छायाचित्र

भाजीपाल्याचा कचरा वाहतूक करीत (Crime News) असल्याचे भासवून गांजा (Ganja) घेऊन जाणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi police) अटक केली आहे. गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Pimpri Chinchwad) सापळा रचून, ३१ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

मैनुद्दीन अब्दुल सत्तार (वय २३, रा. हिंजवडी. मूळ रा. बिहार), बिपलभ बिधन राणा (वय २४, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार रवी पवार यांना माहिती मिळाली की, वाकडकर वस्ती येथे एक व्यक्ती टेम्पो (एमएच १४/एचयु २५५३) मधून गांजा विक्रीसाठी आणला जाणार आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी वाकडकर वस्ती येथे सापळा लावला. वाकड ब्रिजकडून संशयित टेम्पो आला असता त्याला बाजूला घेऊन चौकशी करण्यात आली.

सुरुवातीला टेम्पो चालकाने टेम्पोमध्ये भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली. त्यामध्ये गांजाचे १७ पुडे आढळून आले. ३१ किलो १०० ग्राम गांजा आणि टेम्पो असा एकूण १४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहायक फौजदार महेश वायबसे, पोलीस अंमलदार संतोष डामसे, रवी पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest