Pimpri Chinchwad Crime : काम देण्याच्या बहाण्याने तरुणाची 13 लाखांची फसवणूक

फ्री लान्सिंग जॉब असल्याचे सांगून पेड टास्क देत तरुणाकडून 13 लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणाला कोणताही जॉब अथवा त्याने दिलेले पैसे परत न करता फसवणूक (Fraud) केली. ही घटना 24 ते 30 जून या कालावधी आदर्शनगर, दिघी येथे घडली. (

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Wed, 8 Nov 2023
  • 04:25 pm
Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

फ्री लान्सिंग जॉब असल्याचे सांगून पेड टास्क देत तरुणाकडून 13 लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणाला कोणताही जॉब अथवा त्याने दिलेले पैसे परत न करता फसवणूक (Fraud) केली. ही घटना 24 ते 30 जून या कालावधी आदर्शनगर, दिघी येथे घडली. (Pimpri Chinchwad Crime)

सोहन शत्रुघ्न प्रसाद (वय 29, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8247002803 क्रमांक धारक आणि सोशल मिडिया धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहन यांना एका महिलेने फोन करून तिच्याकडे फ्री लान्सिंगमध्ये जॉब असून तिथे जॉईन केल्यास फायदा होईल असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या लिंक पाठवून सोहन यांना वेगवेगळ्या रकमेचे टास्क दिले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे घेतले. ते पैसे त्यांना परत न करता त्यांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest