fraud : लिंकवर क्लिक करून पैसे पाठवण्यास सांगत एक लाखाची फसवणूक

पार्सल डिलिव्हरीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून दोन रुपये पाठवा, असे सांगत एका तरुणाच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी वाल्हेकरवाडी येथे घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 7 Nov 2023
  • 07:53 pm
fraud : लिंकवर क्लिक करून पैसे पाठवण्यास सांगत एक लाखाची फसवणूक

लिंकवर क्लिक करून पैसे पाठवण्यास सांगत एक लाखाची फसवणूक

पार्सल डिलिव्हरीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून दोन रुपये पाठवा, असे सांगत एका तरुणाच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी वाल्हेकरवाडी येथे घडली.

कृष्णा दिलीप केदार (वय २९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५ वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खाते धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा यांना आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन केले. तसेच टेक्स्ट मेसेजद्वारे दोन लिंक पाठवल्या. पार्सल डिलिव्हरीसाठी मेसेज मधील लिंकवर क्लिक करून दोन रुपये पाठवा, असे कृष्णा यांना सांगण्यात आले. त्यानुसार कृष्णा यांनी लिकवर क्लिक करून दोन रुपये पाठवले असता त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेण्यात आले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest