कसब्यात महिलाशक्ती ठरणार निर्णायक!
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
भाजप आणि महाविकास आघाडीच्या थेट लढतीने प्रतिष्ठेच्या बनलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी होणाऱ्या मतदानात २ लाख ७५ हजार ६७९ मतदारांच्या हाती महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवाराचे भवितव्य असेल.
मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. २ मार्च रोजी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. कसब्यात १ लाख ३६ हजार ९८४ पुरुष आणि १ लाख ३८ हजार ६९० महिला मतदार आहेत. तृतीयपंथी ५, अनिवासी भारतीय ११४ आणि ६ हजार ५७० दिव्यांग मतदार आहेत. सैनिक मतदारांची संख्या ३८ आहे. या मतदारसंघात ८० वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची संख्या १९ हजार २४४ इतकी आहे. त्यांच्यासाठी ७६ ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. कसब्यासाठी ७५६ बॅलेट युनिट, ३७८ कंट्रोल युनिट आणि ४०५ व्हीव्हीपॅट यंत्र वितरित केली आहेत. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, मॅग्नीफाईंग ग्लास आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. कसब्याची मतमोजणी २० फेऱ्यांत पूर्ण होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.