पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याची भिती दाखवून ३७ लाखांना लुटले

कस्टममध्ये तुमचे पार्सल अडकल्याचा बहाणा करत एका महिलेची तब्बल ३७ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून ही घटना मंगळवार, ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 11 Aug 2023
  • 06:32 am
पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याची भिती दाखवून ३७ लाखांना लुटले

पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याची भिती दाखवून ३७ लाखांना लुटले

#पुणे  

कस्टममध्ये तुमचे पार्सल अडकल्याचा बहाणा करत एका महिलेची तब्बल ३७ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून ही घटना मंगळवार, ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादींना आरोपीने फोन करून तुमचे पार्सल कुरिअर कस्टममध्ये अडकले आहे. त्यात पासपोर्ट, लॅपटॉप, ८०० ग्रॅम गांजा व १४० एमडीएमए असल्याचे सांगितले. यातून बाहेर पडण्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी ३६ लाख ९९ हजार ९९९ रुपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली.

हिंजवडी फेज १ येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून करून मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील सांडभोरवाडी येथे फेकल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एकास अटक केली.

मयूर संदीप दळवी (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव असून सौरभ नंदलाल पाटील (वय २३, रा. शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ हा हिंजवडी फेज एक येथील एका आयटी कंपनीत नोकरीस होता. २८ जुलै रोजी तो दुचाकीवरून कंपनीत कामासाठी गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही.

त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्याचा पत्ता लागत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात सौरभ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. ५ ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील सांडभोरवाडी येथे वनविभागाच्या जागेत डोंगर उताराला सौरभ याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे त्याचा खून करून मृतदेह फेकून दिल्याची शक्यता लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सूत्र फिरवत मयूर दळवी याला अटक केली. मयूर दळवी आणि सौरभ पाटील हे कोपरगाव येथे शिक्षणासाठी एकत्र होते. त्यावेळी खुन्नसने बघण्याच्या कारणावरून मयूरच्या मनात सौरभ बद्दल राग होता. त्यातूनच त्याने चाकूने वार करत तसेच दगडाने ठेचून सौरभ याचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

Share this story