Katraj Kondhwa : अब तक ५७!

कात्रज कोंढवा रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर अपघातांचे सत्र हे सुरुच आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

अब तक ५७!

अब तक ५७!

कात्रज-कोंढवा रस्ता बनला मृत्यूचा सापळा; अपघातांचे सत्र थांबेना; तीन वर्षांत ५६ अपघातांची नोंद, गुरुवारी आणखी एक बळी

देवेंद्र शिरूरकर/ महेंद्र कोल्हे

devendra.shirurkar@civicmirror.in

feedback@civicmirror.in

TWEET@mahendrakmirror

कात्रज कोंढवा रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर अपघातांचे सत्र हे सुरुच आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर गुरुवारी सिमेंट पाईप वाहतूक करणाऱ्या (एमएच - १४ जेडी ६९१९) गाडीचा ब्रेक फेल झाला. ती गाडी समोर असणाऱ्या टेम्पोला धडकली. टेम्पो कार आणि दोन दुचाकींना धडकल्यानंतर शाळेच्या गाडीला जाऊन धडकला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. काही शाळकरी मुलांना किरकोळ जखमा झाल्या.

कोंढवा स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. जखमींना भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातामध्ये आठ ते दहा गाड्यांचे नुकसान झाले. पावसाळी सिमेंट पाईप वाहतूक करणाऱ्या (एमएच - १४ जेडी ६९१९) गाडीचा ब्रेक फेल झाला. ती गाडी समोर असणाऱ्या टेम्पोला धडकली. टेम्पो कार आणि दोन दुचाकींना धडकल्यानंतर शाळेच्या गाडीला जाऊन धडकला. पुढे असणाऱ्या शाळेच्या बसची हायवा ट्रकला धडक बसल्याने विद्यार्थ्यांना दुखापत झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ट्रकचालक तेजस काकडे (जिल्हा- बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कृष्णा चौरे (वय ४३, रा. धनकवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  नारायण रामकिशन काटकर (४९) ,रवी बराटे (३२), राधिका बोधे (४०)  सुभाष बंडागळे (४९) प्रमोद शिळमकर (३८)  अशी जखमींची नावे आहेत. अपघातामुळे एका बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून त्या स्माशानभूमीपासून कात्रज चौकापर्यंत असल्याने पूर्णपणे वाहतूककोंडी झाली आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून चालू होते.

दरम्यान ५ ऑगस्टच्या रात्री कात्रज कोंढवा रस्त्यावर कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात आदित्य लाहोटी या ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. कोंढवा (बु) येथील टिळेकरनगरमधील आकृती कंट्रीवुड्स या सोसायटीत आदित्य त्याच्या आई-वडिल आणि बहिणीसोबत राहत होता. एका बहिणीचे लग्न झाले होते. तो एका खासगी आयटी कंपनीत कामाला होता. वडिलांचे वय  झाल्याने कुटुंबाचा सर्व भार त्याच्यावरच होता. मात्र, त्याच्या जाण्याने त्याच्या आईवडिलांचा आधारच गेला आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघातांचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. २०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे भूमीपूजन झाले. तेव्हापासून कात्रजचौक ते खडी मशीनचौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ५६ अपघात झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये २४ मृत्यूंची तर ४३ गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. वाढती अपघातांची संख्या त्यातून होणारे मृत्यू आणि अंपगत्वामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला असून आणखी किती आदित्यसारख्या निष्पाप नागरिकांचा बळी जाणार? असा प्रश्न यानिमीत्त उपस्थित करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा ही मागणी जोर धरत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story