नशा का करतोय ? विचारताच टोळक्यांनी केले डोक्यात वार

एका कंपनी मालकाची हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण मुंढवा परिसर बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ठेवला बंद आहे घराबाहेर नशा करत असणाऱ्या मुलाला विरोध केल्याने एका कंपनी मालकावर वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रवींद्र दिगंबर गायकवाड असे खून झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Tue, 2 May 2023
  • 09:50 am
नशा का करतोय ? विचारताच टोळक्यांनी केले डोक्यात वार

नशा का करतोय ? विचारताच टोळक्यांनी केले डोक्यात वार

हत्येच्या निषेधार्थ मुंढवा परिसर बंदची हाक

एका कंपनी मालकाची हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण मुंढवा परिसर बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ठेवला बंद आहे घराबाहेर नशा करत असणाऱ्या मुलाला विरोध केल्याने एका कंपनी मालकावर वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रवींद्र दिगंबर गायकवाड असे खून झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. आकाश जावळे व साहिल सुतार अशी आरोपीची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांच्या घराबाहेर काही टोळके नशा करत बसले होते. तेव्हा गायकवाड यांनी नशा का करताय? असा प्रश्न विचारला. त्यावेळी या टोळके शिवीगाळ करत निघून गेले. काही वेळानंतर ही मुले सहकाऱ्यांसह धारदार शस्त्र घेऊन पुन्हा गायकवाड यांच्या घराबाहेर आले.

यावेळी गायकवाड यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. डोक्यात गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. मुंडवा परिसरात अशा प्रकारची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. याआधीही कोयत्याचा धाक दाखवत अनेकांनी पैसे लुटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांना या सर्व प्रकाराचा अतिशय त्रास सहन करायला लागत असल्याने त्यांनी मुंढवा परिसरामध्ये एक दिवसीय बंद पुकारला आहे. मुंढवातील टोळक्यांचा वावर कमी व्हावा, यासाठी येथील नागरिकांकडून वारंवार प्रशासनाची दारे ठोठावली जात आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story