Pune Traffic : वाहतूक सुधारणेचा घेतला आम्ही वसा !

‘सीविक मिरर’ आणि ‘ पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘ जरा देख के चलो’ या उपक्रमात आता समाजासाठी काही तरी चांगले करण्याची तीव्र इच्छा आणि आवड असणारे पुणेकर ऊर्फ रस्त्याचे राजे उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि दुचाकीस्वार, वाहन चालक, पादचाऱ्यांमध्ये सुरक्षित रस्ता वाहतुकीबाबत जाणीव निर्माण करणे, हा त्यांचा उपक्रमात सहभागी होण्यामागचा मुख्य उद्देश.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 12 May 2023
  • 03:07 am
वाहतूक सुधारणेचा घेतला आम्ही वसा !

वाहतूक सुधारणेचा घेतला आम्ही वसा !

‘सीविक मिरर’ आणि ‘ पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘ जरा देख के चलो’ या उपक्रमात आता समाजासाठी काही तरी चांगले करण्याची तीव्र इच्छा आणि आवड असणारे पुणेकर ऊर्फ रस्त्याचे राजे उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि दुचाकीस्वार, वाहन चालक, पादचाऱ्यांमध्ये सुरक्षित रस्ता वाहतुकीबाबत जाणीव निर्माण करणे, हा त्यांचा उपक्रमात सहभागी होण्यामागचा मुख्य उद्देश. वाहतूक पोलिसांसमवेत शिट्टी आणि कॅम्पेन शर्ट घातलेले नागरिक शहरातील ३० वर्दळीच्या चौकात सकाळी-संध्याकाळी पाहावयास मिळतात. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना जमेल तेवढी मदत करण्याचे काम ते ठरलेल्या वेळी निष्ठेने पार पाडतात. आपल्याला जमेल तेवढी वाहतूक पोलिसांना मदत केली तर त्यांच्या कामात थोडाफार मदतीचा हात लागेल याची त्यांना कल्पना आहे. वाहतूक समस्येची तीव्रता कमी व्हावी म्हणून पोलिसांना मदत करण्यासाठी समाजाच्या सर्व थरातून आणि शहराच्या सर्व भागातून पुणेकर पुढे येत आहेत. तळपते ऊन असो की वादळी वाऱ्यासोबत येणारी सायंकाळ असो, वाहतूक पोलीस निष्ठेने आपले कर्तव्य जसे पार पाडतात, त्याचपद्धतीने त्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवेने पुणेकर सकाळ-संध्याकाळ रस्त्यावर उतरलेले पाहावयास मिळते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story