नावाला जागले हेल्प रायडर्स !
सीविक मिरर ब्यूरो
सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याची कल्पना हेल्प रायडर्स या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने मांडली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून देणे आणि रुग्णांना ‘गोल्डन अवर्स’ मध्ये रुग्णालयात पोहचविण्याची मोलाची कामगिरी हेल्प रायडर्सचे स्वयंसेवक पार पाडतात. ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो’ या उपक्रमामध्ये अलका चौक आणि गुडलक चौकात हेल्प रायडर्सचे स्वयंसेवक बनले होते रस्त्याचे राजे. प्रशांत कांबळे, सूरज पोतदार, बाळासाहेब ढमाले आणि भारत मिसाळ या स्वयंसेवकांनी दोन चौकात वाहतूक पोलिसांना मदत केली आणि वाहतुकीचे यशस्वी नियंत्रणही केले.
सामाजिक बांधिलकी म्हणून दिवसभर या स्वयंसेवकांनी वर्दळीच्या चौकात वाहतुकीला दिशा देण्याचे, पादचाऱ्यांना मदत करण्याचे काम केले. त्यांचा उद्देश होता वाहनांच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकू नयेत आणि
पुणेकरांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. दिवसभराच्या कष्टानंतर आपला उद्देश यशस्वी झाल्याचा या स्वयंसेवकांचा अनुभव होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.