थोडे थांबा, संयम दाखवा!
गौरव कदम
एखाद्या शनिवारची सायंकाळ चांगल्या कामासाठी घालवायची असेल तर ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो’ सारखा दुसरा चांगला उपक्रम नसेल असे सुमेध केळकर म्हणतात. हे मत त्यांनी अलका चौकातील वाहतुकीचे यशस्वी नियंत्रण करून सिद्ध करून दाखवले आहे. विशेष म्हणजे कोणीही मदतीला नसताना वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. त्यांच्या मतानुसार गेल्या काही वर्षांत पुण्यातील वाहनचालक असो, दुचाकीस्वार असो किंवा पादचारी असोत, त्यांची सहनशिलता संपली आहे. त्यांचा संयम सुटल्याने वाहतुकीचे साधे-साधे नियम पाळणे ते विसरून गेले आहेत. वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी, कर्तव्य पालनात मदतीचा हातभार लावण्यासाठी थोडे थांबण्याची, संयम बाळगण्याची गरज असल्याचे मत केळकर व्यक्त करतात.
केळकरांनी शनिवारची सायंकाळ वाहतूक पोलिसांना मदत करण्यात अशा पद्धतीने व्यतित केली. या अनुभवाबद्दल केळकर म्हणतात की, ‘जरा देख के चलो’ या उपक्रमातील सहभागामुळे वाहतूक शिस्तीचे महत्त्व कळले, तसेच वाहतूक पोलिसांना कोणत्या आव्हानात्मक स्थितीला सामोरे जावे लागते, याचीही जाणीव झाली.
‘जरा देख के चलो’ प्रेझेंटेड बाय ग्रॅव्हीट्टस फाऊंडेशन, को-पॉवर्ड बाय द मिल्स पुणे ॲॅण्ड सेलेबिलिटी ॲॅण्ड इन असोसिएशन विथ न्याती ग्रुप. कॅम्पेन सपोर्टेड बाय लोकमान्य सहकारी सोसायटी आणि शिवतारा प्रापर्टीज. कॅम्पेनचे नॉलेज पार्टनर आहेत कुश चतुर्वेदी.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.