Koyta Gang : वाहनांची तोडफोड; कोयता गँगचा पुन्हा राडा

पुणे शहरातील विविध भागांत कोयत्यांचा वापर करून दहशत प्रस्थापित करणाऱ्या गँगची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारच्या टोळ्यांना वेसण घालण्यात पोलीस अद्यापही पूर्णतः यशस्वी झालेले नाहीत. पुण्यातील औंध परिसरातील वीर भगतसिंग चौकात एका टोळक्याने हातात कोयते घेऊन राडा घालत रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 19 Jul 2023
  • 11:46 pm
वाहनांची तोडफोड; कोयता गँगचा पुन्हा राडा

वाहनांची तोडफोड; कोयता गँगचा पुन्हा राडा

वीर भगतसिंग चौकात धुमाकूळ घालणाऱ्या दहा जणांवर गुन्हा; दोघे अटकेत

#औंध

पुणे शहरातील विविध भागांत कोयत्यांचा वापर करून दहशत प्रस्थापित करणाऱ्या गँगची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारच्या टोळ्यांना वेसण घालण्यात पोलीस अद्यापही पूर्णतः यशस्वी झालेले नाहीत. पुण्यातील औंध परिसरातील वीर भगतसिंग चौकात एका टोळक्याने हातात कोयते घेऊन राडा घालत रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी दहा जणांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. या प्रकरणी आदित्य भारती शेडगे, तेजस अर्जुन गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या एका १७ वर्षाच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश बावधने, विक्रांत देवकुळे, रोहित सहगळे व त्याचे चार साथीदार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात ओंकार युवराज सोकटे (वय २५, रा. औंध रस्ता, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हे तक्रारदार यांच्या पूर्वीच्या वस्तीत राहण्यास असून, ते संबंधित ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आले. त्यांनी तेथे रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या गाड्यांवर दगडाने, हातातील लाकडी दांडक्याने व कोयत्याने तोडफोड करून नुकसान केले. यामध्ये एक रिक्षा, तीन दुचाकी या गाड्यांवर दगड व लाकडी दांडके मारून तीन हजार रुपयांचे नुकसान करण्यात आलेले आहे.

तक्रारदार यांच्या वस्तीतील घराच्या दरवाजास बाहेरून कडी घालून हातातील लोखंडी कोयता, दांडक्याने वार करून 'आम्ही इथले भाई आहेत,आमच्या नादाला कोणी लागेल, तर बघून घेऊ', असे ओरडत आरोपींनी दहशत निर्माण करून सदर ठिकाणावरून ते निघून गेले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story