चिखलीत गुंडांकडून वाहनांची तोडफोड

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून दहशतीचे वातावरण झाले आहे. हातात कोयते घेऊन वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार वारंवार घडून येताना दिसत आहे. काही काळानंतर पुन्हा एका मागोमाग घडणाऱ्या या दहशतवादी घटनांची मालिका सुरूच आहे. काल पहाटे त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. चिखली परिसरातील सरस्वती शाळेजवळ तीन अज्ञात गुंडांनी वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. येथे पहाटे चारच्या सुमारास ८ ते १० वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Mar 2023
  • 10:25 am
PuneMirror

चिखलीत गुंडांकडून वाहनांची तोडफोड

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून दहशतीचे वातावरण झाले आहे. हातात कोयते घेऊन वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार वारंवार घडून येताना दिसत आहे. काही काळानंतर पुन्हा एका मागोमाग घडणाऱ्या या दहशतवादी घटनांची मालिका सुरूच आहे. काल पहाटे त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. चिखली परिसरातील सरस्वती शाळेजवळ तीन अज्ञात गुंडांनी वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. येथे पहाटे चारच्या सुमारास ८ ते १० वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.

सरस्वती शाळेजवळ उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यात रिक्षा, कार, टेंपो अशा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे नुकसान झाले आहे. हातात कोयते घेऊन तिघांनी हुल्लडबाजी करत पहाटे दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. अशा पध्दतीने गुंडांनी दहशत माजवून एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरामध्ये मागील काही दिवस वाहन तोडफोडीचे सत्र थांबलेले होते. परंतु, ते पुन्हा सुरू होते की काय? अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात शांतता नांदत होती. परंतु, पुन्हा तोडफोडीच्या घटनेने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास चालू आहे, लवकरात लवकर त्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली.

शुक्रवारी ३ तारखेला वाकड येथील फिनिक्स मॉलमध्ये घुसून कोयता गँगने माथाडी कामगारांना कोयत्याने मारहाण करून पैसे काढून घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माथाडी कामगार असून ते मित्रांसोबत वाकड येथील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी गेले होते. तेव्हा त्यावेळी सहा ते सात जण तोंडाला मास्क लावून गेटमधून आत आले. फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story